आवाज महाराष्ट्राचा

जन माणसाचा हक्काचा आवाज

बिरोबा दूध संस्थेकडून प्रति लिटर ३ रुपये ७० पैसे बोनस वाटप

1 min read

जुन्नर तालुक्यात सर्वाधिक बोनस देणारी सहकारी दूध संस्था

वडगाव कांदळी:– बिरोबा महाराज सहकारी दूध उत्पादक सहकारी संस्था वडगाव कांदळी (ता. जुन्नर )या संस्थेने सन २०२४- २५ मध्ये दूध पुरवठा करणाऱ्या सभासदांना प्रति लिटर ३ रुपये ७० पैसे बोनस व दहा टक्के लाभांशाचे नुकतेच वाटप करण्यात आले. तसेच दूध उत्पादक सभासदांना उत्कृष्ट पद्धतीचे जर्किंग वाटप करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन संदेश पाचपुते यांनी दिली.

 

दूध उत्पादकांना दिवाळी बोनस व भेटवस्तू वाटप प्रसंगी दूध उत्पादकांचा भव्य मेळावा घेण्यात आला होता यावेळी दूध उत्पादकांना कृषी कन्या आदर्श दूध उत्पादक श्रद्धा ढवण यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जुन्नर चे माजी आमदार अतुल बेनके, पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालक बाळासाहेब खिलारी ,भाऊसाहेब देवाडे, वडगाव कांदळीच्या सरपंच उल्का पाचपुते, माजी सरपंच रामदास पवार ,ज्ञानेश्वर निलख ,बाजार समितीचे संचालक नबाजी घाडगे, बिरोबा पतसंस्थेचे चेअरमन सचिन निलख ,साईलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन प्रा. श्रीकांत पाचपुते ,श्री गणेशा पतसंस्थेचे चेअरमन सुनील पवार ,माजी उपसरपंच शरद पाचपुते ,विठ्ठल पाचपुते, पोलीस पाटील बाळासाहेब पाचपुते, शिवशंकर दूध संस्था थोरांदळेचे चेअरमन बाळासाहेब टेमगिरे, खंडोबा दूध संस्था जाधववाडीचे चेअरमन संदीप जाधव, शैनेश्वर दूध संस्थेचे सचिव युनुसभाई पटेल, हिवरे दूध संस्थेचे चेअरमन चिमणराव वायाळ ,ऑडिटर कैलास तांबडे ,बिरोबा पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन नटराज भोर, संचालक ज्ञानेश्वर थोरात, तज्ञ संचालक संभाजी पवार, ग्रामपंचायत सदस्य पंढरीनाथ पाचपुते ,जिजाभाऊ भोर, सत्यवान थोरात, राजापूरे साहेब, मनीष मोरडे, संदिप निलख,सोसायटीचे व्हाईस चेअरमन जावेद इनामदार, ओतूर चीलिंग सेंटरचा संपूर्ण स्टाफ, दूध संघाचे इनपुट विभागाचे सर्व अधिकारी वर्ग यांच्यासह बिरोबा दूध संस्थेचे चेअरमन संदेश पाचपुते, संचालक गणपत कडूसकर ,प्रकाश थोरात, विनोद पवार, प्रवीण लांडगे, कैलास थोरात, शांताबाई पवार, इंदुबाई निलख ,मंगल पाचपुते, जयकुमार पाचपुते ,मच्छिंद्र पाचपुते, ज्ञानेश्वर पवार, विनोद लांडगे ,सचिव जयसिंग पवार, नंदकुमार मुटके ,पांडुरंग पाचपुते, वंदना पाचपुते ,चंद्रकांत पाचपुते व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रीकांत पाचपुते यांनी केले प्रस्तावना चेअरमन संदेश पाचपुते यांनी केली उपस्थितांचे आभार सचिन निलख यांनी मानले.

 

बोनस वाटप प्रसंगी प्राथमिक सन्मान

सूर्यकांत पवार, सुभाष पाचपुते , केरभाऊ थोरात, सुनंदा मुटके ,स्वाती लांडगे, संभाजी भो,र बाबुराव घाडगे, गणेश काळे , आयशा पठाण, खंडू निलख

 

फीडबॅक कंपनीमार्फत लकी ड्रॉ विजेते

देवेंद्र पाचपुते, अर्जुन निलख, प्रकाश थोरात, विनोद लांडगे, बबन पाचपुते ,अमोल पवार, सतीश भोर, अतुल हांडे, सुनील मुटके

जुन्नर तालुक्यात सर्वाधिक बोनस देणारी सहकारी दूध संस्था

बिरोबा महाराज सहकारी दूध संस्था ही जुन्नर तालुक्यात सर्वाधिक बोनस देणारी संस्था आहे . बोनस वाटप प्रसंगी जुन्नर चे माजी आमदार अतुल बेनके यांनी संस्थेचे कौतुक केले संस्था सातत्याने तालुक्यात सर्वाधिक बोनस देत आहे या संस्थेचा अभिमान असल्याचे बोलताना त्यांनी सांगितले. दूध उत्पादक केंद्रबिंदू म्हणून मानून संस्थेने केलेली प्रगती निश्चितच कौतुकास्पद आहे यावेळी दूध संघाचे संचालक बाळासाहेब खिलारी व भाऊसाहेब देवाडे यांनी संस्थेची उत्तरोत्तर अशीच प्रगती होऊ अशी सदिच्छा दिल्या.

 

बिरोबा महाराज सहकारी दूध उत्पादक संस्थेची १९८७ साली स्थापना झाली असून संस्थेने सन २०२४- २५ मध्ये ९लाख ९०हजार १६२ लिटरचे संकलन केले असून सभासदांना ३६ लाख ६३ हजार ५९९ रुपयाचे बोनस वाटप केला असून संस्थेला या आर्थिक वर्षात १७लाख ९४ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे . संपूर्ण संस्था संगणकीकृत असून दूध उत्पादकांचे पगार दर दहा दिवसाला बँक खात्यामध्ये जमा होतात. संस्था दूध उत्पादकांच्या हितासाठी सातत्याने प्रयत्नशील असते”.

संदेश पाचपुते

चेअरमन, बिरोबा महाराज सहकारी दूध संस्था 

वडगाव कांदळी, ता. जुन्नर

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे