वडगाव कांदळीत सार्थक चा प्रतापगड ठरतोय लक्षवेधी
1 min readवडगाव कांदळी:- वडगाव कांदळी( ता. जुन्नर )येथील मुटके मळा येथे सार्थक रमेश मुटके याने प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती तयार केली असून ती पाहण्यासाठी परिसरातील अनेक लोक येत आहेत. सार्थक हा इयत्ता बारावी मध्ये शिकत असून गेली पाच वर्षापासून दिवाळी सुट्टीमध्ये तो किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवत आहे त्याने या अगोदर लाल किल्ला, जंजिरा , सिंहगड या किल्ल्यांच्या प्रतिकृती आकर्षक बनविल्या आहेत. सार्थक ला हा किल्ला बनवण्यासाठी सात ते आठ दिवस लागले असून यासाठी त्याला शिवशंभु ग्रुपचे सहकार्य लाभले .यात सुयोग मुटके ,समर्थ मुटके,जान्हवी मुटके , साईराज मुटके, सार्थक शेळके यांनी मदत केली.
या किल्ल्याची प्रतिकृती बनविण्यासाठी दोन टन माती,दगड, विटा, बारदान इत्यादी घरगुती वस्तूंचा वापर केला आहे. विशेष म्हणजे हा किल्ला बनवण्यासाठी कोणतेही प्लास्टिकच्या वस्तूचा वापर केला नाही. प्रदूषण विरहित साहित्य वापरलेले असुन यामध्ये कागदी घरे बनवण्यात आले असून या मधून त्याने किल्ले संवर्धनाकडे लक्ष द्यावे, ऐतिहासिक वारसा जतन करावा असा संदेश दिला आहे. या किल्ल्याची प्रतिकृती बनविण्यासाठी सार्थक ला आई साईलक्ष्मी पतसंस्थेच्या संचालिका पूजा मुटके, वडील रमेश मुटके, सुनिता मुटके व योगेश मुटके, आजोबा बाळासाहेब मुटके यांचे सहकार्य लाभले तसेच या किल्ल्याला कलर देण्यासाठी मनोज जांभळे पेंटर यांनी दहा लिटर कलरचे सहकार्य केले. तसेच या किल्ल्याची प्रतिकृती बनविण्यासाठी आकाश चिंचवडे यांनी संपूर्ण पुठ्ठा देऊन सार्थक ला सहकार्य केले.

प्रतापगड किल्ला सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर जवळ आहे. प्रथम किल्ल्यावर सुरुवात करायची म्हटलं तर प्रवेशद्वारांमधून आत मध्ये प्रवेश केल्यानंतर सूर्य बुरुज पुढे काही अंतर चालून गेल्यानंतर चिलखती संरक्षण त्यामुळे महादरवाजा क्रमांक दोन त्यामधून आत मध्ये प्रवेश केल्यानंतर कुस्तीचे मैदान,भवानी माता मंदिर, दारूगोळा कोठार, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, राजवाडा, भवानी बुरुज अशा वास्तू आहेत यशवंती तिहेरी बुरुज देखील आहे. प्रतापगड च्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला अशी संपूर्ण रचना सार्थक ने साकारली आहे.

सार्थकचा किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात लोक येत असतात सार्थक ला किल्ला बनवणे स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत अनेक प्रथम क्रमांकाचे पुरस्कार मिळाले आहेत. शेवंताई फाउंडेशन नारायणगाव चे आकाश दादा बोरकर मित्र परिवाराच्या वतीने दिला जाणार द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार सार्थक च्या प्रतापगड किल्ल्याच्या प्रतिकृतीला दिला असून या सन्मानचिन्ह, ११ हजार रुपये रोख असा पुरस्कार यावर्षी मिळाला आहे.

प्रतापगडाची प्रतिकृती हा किल्ला पाहण्यासाठी वडगाव कांदळी च्या सरपंच उल्काताई श्रीकांत पाचपुते, उपसरपंच संजय खेडकर ,माजी सरपंच रामदास पवार, ग्रामपंचायत सदस्य संगीता भोर , सुवर्णा मुटके,सोसायटी चेअरमन संजय मुटके, साईलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन प्रा. श्रीकांत पाचपुते, बिरोबा पतसंस्थेचे चेअरमन सचिन निलख,गोरक्ष मुटके,धोंडीभाऊ मुटके, मनोहर पटाडे, रवी काळे, पाटीलबुवा भोर , कृष्णा भोर,रोहन भोर, बाजीराव भोर, सुनिल मुटके, बबन मुटके ,सागर दहीतुले, युवा नेते वैभव काळे, बाजीराव मुळे, उद्योजक अभिषेक मुटके, अजिंक्य घाडगे, सुरज भाऊ वाजगे यांच्यासह मित्रपरिवार, दुर्गप्रेमी सौरभ मंडलिक, राजू भोर, मनसे जिल्हाप्रमुख मकरंद पाटे यांच्यासह त्यांचा मित्रपरिवार, शिवभूमीपुत्र प्रतिष्ठान वडगाव कांदळी चे संदीप निलख, रोहिदास पाचपुते ,मंगेश पाचपुते, बार्शीनाथ पाचपुते, नारायण पाचपुते, तुकाराम पाचपुते, बंडू राठोड ,सागर पाचपुते, कैलास निलख सेवेचे ठाई तत्पर ग्रुप आळे चे कार्यकर्ते निलेश भुजबळ, आदेश दळवी ,दत्ता औटी,विजू माळी, ऋषी साबळे ,यतीन शेटे, डॉ. मंदार डुंबरे यांच्यासह अनेकांनी भेटी दिल्या आहेत.
वडगाव कांदळी चे सरपंच उल्काताई पाचपुते यांनी सार्थक ला छत्रपती शिवरायांची प्रतिमा भेट देऊन सन्मान केला तर माजी सरपंच रामदास पवार यांनी सार्थकच्या या कार्यास शुभेच्छा दिल्या. दरवर्षी सार्थक नाविन्यपूर्ण किल्ले बनवत असल्याने परिसरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
