आवाज महाराष्ट्राचा

जन माणसाचा हक्काचा आवाज

नगदवाडी केंद्रशाळेत कला क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा उत्साहात संपन्न

1 min read

वडगाव कांदळी :- नगदवाडी ता.जुन्नर येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत यशवंतराव चव्हाण कला क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा उत्साहात पार पडल्या अशी माहिती नगदवाडी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिनेश बढे यांनी दिली.
केंद्रस्तरीय स्पर्धांच्या निमित्ताने केंद्रातील नगदवाडी,वडगाव, १४नंबर, कांदळी,भोरवाडी,सुतारठिके व मोकसबाग या शाळांतील विद्यार्थी स्पर्धकांनी खो-खो,लंगडी,कबड्डी, लोकनृत्य,लेझीम,भजन, कविता गायन,वक्तृत्व,धावणे,लांबउडी,उंचउडी,गोळाफेक,थाळीफेक, बुद्धिबळ,प्रश्नमंजुषा,वेशभूषा आदि विविध स्पर्धांत सहभाग घेऊन स्पर्धांचा आनंद घेत यश संपादन केले.
सर्व यशस्वी स्पर्धकांना सन्मानचिन्ह(ट्रॉफीज् ),मेडल व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.यासाठी यशोदिप सहकारी पतपेढी मुंबईचे अध्यक्ष रोहिदास बढे,वेदिका मसाले उत्पादक गणेश दुरगुडे,गुरुप्रसाद पापड मल्चिंग मसाला क्रश उद्योग समूहाच्या सिमा दुरगुडे,केंद्रप्रमुख वनिता हांडे,केंद्रशाळेच्या मुख्याध्यापिका उज्वला बोऱ्हाडे यांचे आर्थिक सहकार्य लाभले.
स्पर्धांच्या निमित्ताने ग्रामपंचायत सदस्य नंदा बढे,अनिलबापू भोर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिनेश बढे,शाळा सल्लागार समिती अध्यक्ष सुरेश बढे,उपाध्यक्ष शिवशंकर मांडे,सदस्य तानाजी बढे,दिनेश कुतळ,दयानंद बढे,संगिताताई बढे,अक्षदा जाधव,शरद पाचपुते,गणेश कुतळ,सुभाष बढे,बंटी नायडू,गणेश भोर,पिराजी भोर आदी मान्यवर,ग्रामस्थ,मार्गदर्शक शिक्षक,पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धांचे नियोजन नगदवाडी केंद्राच्या केंद्रप्रमुख वनिता हांडे, मुख्याध्यापिका उज्वला बोऱ्हाडे,शिक्षक मंगेश मेहेर,पंडित चौगुले,निलेश शेलार,विद्या वाघ, सुप्रिया अभंग,आशा आरेकर, उज्वला कांबळे व नगदवाडी केंद्रातील शिक्षकांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश मेहेर यांनी केले तर आभार निलेश शेलार यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे