राजूर येथे डांगी जनावरांचे प्रदर्शन
1 min read
राजूर ( मनोहर भांगरे):- ग्रामपंचायत राजूर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजूर व पशुसंवर्धन विभाग जि.प. अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमानेसुधारित देशी व डांगी जनावरांचे तसेच शेतीमालाचेभव्य प्रदर्शन शनिवार दि. ६ डिसेंबर २०२५ ते बुधवार दि. १० डिसेंबर २०२५ या कालावधीत पिंपरकणे रोड, राजूर, ता. अकोले, जि. अहिल्यानगर या ठिकाणी आयोजित करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार किरण लहामटे, माजी आमदार वैभव पिचड, सरपंच पुष्पाताई निगळे, उपसरपंच संतोष बनसोडे उपस्थित होते. दरवर्षी हे प्रदर्शन भरत असून आदिवासी भागातील हे सर्वात मोठे प्रदर्शन आहे.

या प्रदर्शनात सुधारित देशी व डांगी जनावरांचे तसेच शेतीमालाचे नामशेष होत चाललेल्या बियांच्या वेगवेगळ्या बियाण्यांचे प्रकार पहावयास मिळतात. या वर्षी कडाक्याची थंडी पडली असताना देखील या प्रदर्शनात मोठ्या प्रमाणात डांगी जनावरांसह व्यावसायिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. प्रदर्शन काळात कोणता अनुचित प्रकार घडू नये याकरिता ग्रामपंचायत व राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर पवार व कर्मचारी हे यावर विशेष लक्ष ठेवून आहेत.

या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी पुष्पाताई लहामटे, सतीश भांगरे, मधुकर तळपाडे, दिलीप भांगरे,माजी सरपंच गणपतराव देशमुख,माजी उपसरपंच गोकुळ कानकाटे, दत्ता निगळे आदी ग्रामस्थ व ग्रामविकास अधिकारी राकेश पाटील उपस्थित होते.