आवाज महाराष्ट्राचा

जन माणसाचा हक्काचा आवाज

शांतता पुणेकर वाचत आहेत उपक्रमास मॉडर्न मध्ये उस्फूर्त प्रतिसाद

1 min read

बेल्हे :- शांतता पुणेकर वाचत आहे या उपक्रमांतर्गत बेल्हे (ता. जुन्नर) येथील मॉडर्न इंग्लिश स्कूल या शाळेत विद्यार्थी ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

वाचन ही विद्यार्थ्यांच्या विकासाची अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. वाचनाने शब्दसंपदा वाढते ,आकलन शक्ती तीक्ष्ण होते. सर्जनशीलता विकसित होते. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती दृढ होण्यासाठी शाळेत वाचनाचा एक तास हा उपक्रम नियमितपणे राबवत असल्याचे प्राचार्य विद्या गाडगे यांनी सांगितले.

इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता. पुणे पुस्तक महोत्सव २०२५ अंतर्गत मंगळवारी (दि.९) रोजी सकाळी ११ते १२ या वेळेत या उपक्रमात सहभाग घेण्यात आला होता. या उपक्रमाचे संस्थेचे संस्थापक सीए सावकार गुंजाळ, चेअरमन गोपीनाथ शिंदे, सीईओ शैलेश ढवळे ,विश्वस्त दावला कणसे यांनी कौतुक केले .हा उपक्रम शाळेच्या प्राचार्य विद्या गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला असून उपक्रम यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य के .पी.सिंग, ग्रंथपाल पोपट बढे ,शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे