आवाज महाराष्ट्राचा

जन माणसाचा हक्काचा आवाज

पुणेकर वाचत आहे उपक्रमास नगदवाडीत उत्स्फूर्त प्रतिसाद

1 min read

वडगाव कांदळी:- पुणे पुस्तक महोत्सव अंतर्गत न्यू इंग्लिश स्कूल नगदवाडी ,कांदळी (ता. जुन्नर) विद्यालयामध्ये ११ ते २ या वेळामध्ये पुस्तक वाचन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या कालावधीत विद्यार्थ्यांनी एका पुस्तकाचे वाचन करून सदर वाचलेल्या पुस्तकातील अभिप्राय नमूद करून ठेवण्यात आले आहे वाचन संस्कृती ही आजच्या काळाची खऱ्या अर्थाने गरज असून मोबाईल व समाज माध्यमे यामुळे तरुणाची तरुण पिढी वाचनापासून दूर जाते की काय अशी परिस्थिती निर्माण असताना आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये होत असलेला हा उत्सव निश्चितच प्रेरणा देणारा ठरेल या या निमित्ताने विद्यालय मध्ये सदर कार्यक्रमाचे आयोजन करून त्यामध्ये विद्यार्थी , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले.अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ.दीपक घाडगे यांनी दिली या प्रसंगी विद्यालयातील शिक्षक दिलीप तोतरे , राजेश जाधव संकल्प चासकर,संगीता गाडेकर उपस्थित होते. त्याचप्रमाणे अनिल गुंजाळ , रमेश वारुळे , मंगेश रोकडे , चंद्रकांत घाडगे, बबन भालेराव उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे