जंक फूड ने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात : प्रा. सुनील अडसुळे
1 min read
वडगाव कांदळी:- न्यू इंग्लिश स्कूल नागदवाडी कांदळी (ता. जुन्नर) येथे जंक पुढचे दुष्परिणाम या विषयावर प्रा. सुनील अडसुळे मॉडर्न महाविद्यालय पुणे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आलेले होते त्यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना घरातील अन्न हेच खरे पोषण असून विद्यार्थ्यांनी जंक फूड कोल्ड्रिंक्स यांच्या आहारी न जाता सिजनल फळे लिंबू सरबत इत्यादींचा मानवी जीवनातील आहाराचे महत्त्व विशद केले.

तसेच जंक फूड जसे की पिझ्झा ,बर्गर ,कोल्ड ड्रिंक्स ,चायनीज पदार्थ यामध्ये रासायनिक पदार्थांचा अवलंब केल्यामुळे मानवी जीवनावर त्याचे दुष्परिणाम कालांतराने दिसून येतात त्यातूनच विद्यार्थ्यांमध्ये मधुमेह रक्तदाब यांसारखे विकार कमी वयात आढळतात त्यामुळे आजच्या तरुणाईने यापासून दूर राहून आपले आरोग्य अबाधित ठेवणे ही काळाची गरज बनली आहे याची जाणीव जागृती सतत ठेवून आपल्या घरातील इतर व्यक्तींनाही या समस्यांची जाणीव करून देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्रा. अडसूळ यांनी आपल्या व्याख्यानात नमूद केले अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. दीपक घाडगे यांनी दिली सभेचे सूत्रसंचालन श्री दिलीप तोतरे यांनी तर आभार राजेश जाधव यांनी मानले याप्रसंगी डॉ. सत्यवान थोरात, विद्यालयातील शिक्षक संकल्प चासकर, संगीता गाडेकर तसेच शिक्षकेतर कर्मचारी रमेश वारुळे ,चंद्रकांत घाडगे , बबन भालेराव, अनिल गुंजाळ, मंगेश रोकडे उपस्थित होते.