आवाज महाराष्ट्राचा

जन माणसाचा हक्काचा आवाज

वडगाव कांदळी येथे भव्य २०-२० बैलगाडा शर्यतीचे आयोजन

1 min read

वडगाव कांदळी:- श्री शंभो महादेव प्रतिष्ठान वडगाव कांदळी आयोजित शिवशंभो महादेव यात्रा उत्सवानिमित्त निमंत्रित २०- २० भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मुख्य आयोजक वडगाव कांदळी गावचे माजी सरपंच रामदास पवार यांनी दिली. ही स्पर्धा दि. १३ व १४ डिसेंबर २०२५ या कालावधीत हिंदकेसरी बैलगाडा घाट वडगाव कांदळी (ता. जुन्नर )येथे आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेसाठी बक्षीस म्हणून ५ लाख ५७हजार रुपयांचे रोख रक्कम , बुलेट ,चार आकर्षक चषक, चार ढाल देण्यात येणार आहे .


प्रथम क्रमांकाच्या गाड्या १ लाख११ हजार एकशे अकरा रुपयांचे बक्षीस असून फळीफोड गाड्यास १५ हजार रुपये देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांक १लाख१ हजार व फळीफोडसाठी १० हजार रुपये बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती महेंद्र सोनवणे ,राहुल थोरात, अक्षय पाचपुते यांनी दिली.

सर्वात आतून येणाऱ्या गाड्यास शंभू महादेव केसरी किताब व महाराजा बुलेट देण्यात येणार आहे. एक नंबर फायनलसाठी ८१ हजार रुपये, दोन नंबर फायनलसाठी ६१ हजार रुपये, तीन नंबर फायनल साठी ४१ हजार रुपये, चार नंबर फायनल साठी३१ हजार रुपये, पाच नंबर फायनल साठी २१हजार रुपये, सहा नंबर फायनल साठी १५हजार रुपये ,सात नंबर फायनल साठी १०हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. शंभू महादेव केसरी बैलगाडा शर्यतीसाठी बैलगाडा मालक, बैलगाडा प्रेमी ,बैलगाडा शौकीन यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री शंभू महादेव यात्रा उत्सव कमिटी वडगाव कांदळी( ता. जुन्नर) यांच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे