पांडुरंग काळे शंभू महादेव केसरी महाराजा २०२५चे मानकरी
1 min read
पांडुरंग काळे शंभू महादेव केसरी महाराजा २०२५चे मानकरी
वडगाव कांदळीत बैलगाडा शर्यतीला तुडुंब गर्दी
वडगाव (कांदळी) – श्री शंभू महादेव प्रतिष्ठान प्रतिष्ठान आयोजित शंभू महादेव यात्रा निमित्त श्री शंभू महादेव केसरी २०२५ निमंत्रित भव्य ट्वेंटी-ट्वेंटी बैलगाडा शर्यतीचे आयोजन दिनांक १३ व १४ डिसेंबर रोजी वडगाव कांदळी (ता.जुन्नर) करण्यात आले होते. या स्पर्धेत ३०० बैलगाडा मालकांनी भाग घेतला होता. शंभू महादेव केसरी महाराजा किताब २०२५ चे पांडुरंगशेठ किसनराव काळे हा बैलगाडा मानकरी ठरला.

दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत पहिल्या क्रमांकाची फळीफोड देवांश अक्षय पोखरकर व जानकू काशिनाथ पानसरे यांचा बैलगाड्याने फोडली. तर द्वितीय क्रमांकांची फळीफोड मंगेश भगवान मुळे व तबाजी दत्तात्रय काळे यांच्या बैलगाडयाने फोडली तसेच फायनल मध्ये प्रथम क्रमांकात अनुप नामदेव काळे व पाटीलबुवा बाळाजी दाभाडे यांचे बैलगाडे आले .तसेच या ठिकाणी प्रथम क्रमांकात ५५ तर द्वितीय क्रमांकात १४० बैलगाडे धावलेअसल्याची माहिती रामदास पवार यांनी दिली.

घाटाचा राजा ठरलेला पांडुरंग काळे यांच्या बैलगाडयास एक बुलेट मोटार सायकल बक्षीस देण्यात आले . प्रथम क्रमांकासाठी १ लाख ११ हजार१११ रुपयांचे बक्षीस तर फळीफोड गाड्यांसाठी १५ हजार व चषक देण्यात आला तर द्वितीय क्रमांकासाठी १ लाख १ हजार रुपयांचे बक्षीस व फळीफोड गाड्यांसाठी १० हजार रुपये बक्षीस देण्यात आले .घाटाचा राजासाठी एक नंबर फायनल साठी ८१ हजार रुपये, दोन नंबर फायनल साठी ६१ हजार, तीन नंबर फायनल साठी ४१ हजार, चार नंबर फायनल साठी ३१ हजार ,पाच नंबर फायनल साठी २१ हजार,सहा नंबर फायनल साठी १५ हजार व सात नंबर फायनल साठी ११ हजार ,आठ नंबर फायनल साठी १० हजार व नऊ नंबर फायनल साठी १० हजार व दहा नंबर फायनल साठी १० हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले.
तसेच या यात्रोत्सवाला माजी आमदार अतुल बेनके,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार,माऊली खंडागळे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती निवृत्ती काळे, कांदळी चे माजी सरपंच बाळासाहेब बढे, खरेदी विक्री संघाची माजी अध्यक्ष अशोक बढे,नबाजी घाडगे,वैभव तांबे, संभाजी चव्हाण, गावच्या सरपंच उल्का पाचपुते,उपसरपंच संजय खेडकर,माजी सरपंच रामदास पवार आदी मान्यवरांनी भेटी दिल्या.तर यात्रोत्सव शांततेत पार पडण्यासाठी शंभु महादेव प्रतिष्ठानच्या वतीने सर्व सदस्यांनी अतोनात मेहनत घेतली असल्याची माहिती स्पर्धेचे मुख्य आयोजक माजी सरपंच रामदास पवार यांनी दिली.
प्रतिक्रिया
“वडगाव कांदळी या गावची संपूर्ण महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीचे गाव म्हणून ओळख तयार झाली आहे. अतिशय उत्तम नियोजन, प्रशस्त जागा, सुयोग्य घाट यामुळे बैलगाडा मालक व प्रेक्षकांची वडगाव कांदळी घाटाला नेहमीच पसंती असते. जुन्नर, आंबेगाव, पारनेर, श्रीगोंदा, अकोले,संगमनेर, शिरूर ,खेड, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातून मोठ्या प्रमाणात बैलगाडे व प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित राहतात वर्षभरात अनेक वेळा या ठिकाणी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जाते व या शर्यतींना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असतो.”
उल्का श्रीकांत पाचपुते
सरपंच, वडगाव कांदळी ता. जुन्नर