सरपंच उल्काताई पाचपुते यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
1 min read
वडगाव कांदळी :- वडगाव कांदळी (ता. जुन्नर )येथील आदर्श सरपंच उल्काताई श्रीकांत पाचपुते यांचा वाढदिवस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोरवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव कांदळी येथे विद्यार्थ्यांना मिठाई वाटप तसेच शालेय साहित्याचे वाटप करून साजरा करण्यात आला.

यावेळी सरपंच उल्काताई पाचपुते, उपसरपंच संजय खेडकर, माजी सरपंच रामदास पवार, ग्रामविकास ट्रस्टचे सचिव बबन पाचपुते, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद पाचपुते, ग्रामपंचायत सदस्य पंढरीनाथ पाचपुते, कृष्णा भोर, रंगनाथ पाचपुते, नारायण पाचपुते, कांबळे सर, नवले सर, शाळा व्यवस्थापन समिती भोरवाडी चे अध्यक्ष लहू भोर, दत्तू भोर, पाटीलबुवा भोर,सिद्धू सावंत, नितीन पाचपुते, बाजीराव भोर प्रकाश थोरात, गाढवे मॅडम डोंगरे मॅडम, कांताबाई भोर, अश्विनी पाचपुते यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
