आवाज महाराष्ट्राचा

जन माणसाचा हक्काचा आवाज

जमिनीत पिके वाढली नाहीत तर सजीव सृष्टी नष्ट होईल : मृदाशास्त्रज्ञ योगेश यादव

1 min read

वडगाव कांदळी:- ग्रामोन्नती मंडळाचे गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, नारायणगाव आणि निर्मलग्राम वडगाव कांदळी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार हिवाळी शिबिरामध्ये कृषी विज्ञान केंद्राचे मृदा शास्त्रज्ञ योगेश यादव यांचे ‘जमिनीचे आरोग्य आणि व्यवस्थापन’ या विषयावर व्याख्यान झाले. जमीन हीच सजीव सृष्टीसाठी आवश्यक बाब असून या जमिनीचे आपण योग्य त्या पद्धतीने संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. रासायनिक खते देण्यापेक्षा सेंद्रिय खतांचा वापर केल्यास जमिनीची प्रत सुधारेल. पाण्याच्या निचरा चांगला होईल आणि जमीन रासायनिक होण्यापासून वाचेल. जमिनीमधून विषारी पिकांची निर्मिती होते. आरोग्यासाठी ही सर्व पिके धोक्याची आहेत. जुन्नर तालुक्यात कॅन्सरचे प्रमाण प्रचंड वाढत आहे. दिवसेंदिवस हृदय रोगाचे प्रमाण वाढत आहे. लहान मुलांमध्येसुद्धा ही गंभीर समस्या वाढत चालली आहे. म्हणून सर्वांनी जमिनीच्या आरोग्याबाबत जागरूक राहून जमीन निरोगी कशी राहील याबाबत प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे, असे विचार मृदा शास्त्रज्ञ योगेश यादव यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ग्रामपंचायत सदस्य पंढरीनाथ पाचपुते होते. अध्यक्षस्थान बिरोबा महाराज दूध संस्थेचे चेअरमन संदेश पाचपुते यांनी भूषविले. यावेळी व्यवसायिक विभाग प्रमुख डॉ सत्यवान थोरात, प्रा हनुमंत कदम , अरुण हिंगे ,वनिता जगताप, मनीषा देशमुख ,चैताली आवटे, साहेबराव गाळव, जयश्री कोल्हे शैलेश कावळे ,ललिता व्यवहारे, रूपाली जरे उपस्थित होते .कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख संतोष देशपांडे यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे