व्ही. जे. स्कूल, नगदवाडी येथे सांस्कृतिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
1 min read
वडगाव कांदळी :- विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूल, नगदवाडी, कांदळी ( ता. जुन्नर) येथे सामाजिक बांधिलकी, संस्कार आणि सृजनशीलतेचा अभूतपूर्व संगम घडवत सांस्कृतिक स्नेहसंमेलन २०२५-२६ दिमाखात आणि कलात्मक पद्धतीने पार पडले. ‘Social Awareness & Spreading Kindness’ या हृदयाला भिडणाऱ्या थीमद्वारे विद्यार्थ्यांनी समाजातील विविध प्रश्नांवर प्रभावी आणि संवेदनशील संदेश देत उपस्थितांची मनं जिंकली.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून बजरंगशेठ शेळके, डायरेक्टर विशाल जुन्नर सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबई यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावले. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणूनअरुण पारखे अध्यक्ष विशाल जुन्नर सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबई व सचिव स्वर्गीय नंदकुमार वाजगे फाउंडेशन, नारायणगाव, तसेचकांदळी ग्रामपंचायतीच्या सरपंच पल्लवी भोरयांची उपस्थिती लाभली.या समवेत संजय शेळके उद्योजक, ज्ञानेश्वर पारखे खजिनदार , दगडूशेठ आग्रे ज्येष्ठ सभासद विशाल जुन्नर सेवा मंडळ, विजय नाना शेळके संचालक कुलस्वामी को-ऑपरेटिव्ह सोसायटी, मुंबई. इंद्रजीत शेळके अध्यक्ष नागरी सेवा पतसंस्था, धनगरवाडी, ज्ञानेश्वर निलख माजी सरपंच वडगाव कांदळी,पोपट गायकवाड , मेघाताई काकडे याही मान्यवरांची उपस्थिती लाभली.तसेच विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुशशेठ सोनवणे , उपाध्यक्ष दिनेश पाडेकर, सेक्रेटरी विजय पारखे ,विश्वस्त संपत काने तसेच विश्वस्त विक्रांत काळे व सी.ई.ओ डॉ .दुष्यंत गायकवाड यांनी ही विशेष उपस्थित राहून कार्यक्रमाला मंगलमयी स्वरूप प्रदान केले. पालक शिक्षक संघ कमिटीचे उपाध्यक्ष किशोर काकडे यांनीही कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शवली.
दीपप्रज्वलनानंतर मान्यवरांचे स्वागत होऊन, विविध क्रीडा व इतर स्पर्धांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवशाली सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागतगीताने झाली. त्यानंतर प्री-प्रायमरीच्या लहानग्यांनी सादर केलेल्या रंगतदार नृत्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
इयत्ता १ ते ९ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी समाजहिताचे विविध संदेश देणारी गीते, नाट्यरुपांतरे आणि नृत्य सादर केली. ‘मुलगी वाचवा’, ‘पाणी वाचवा’, ‘झाडे वाचवा’, ‘मैत्रीचे नाते जोडा’, ‘आई-वडिलांचा सन्मान करा’, ‘देशाचे रक्षण करा’, ‘शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा’, ‘निसर्ग वाचवा’ अशा संवेदनशील विषयांना नृत्य-नाट्याच्या माध्यमातून प्रभावी मांडणी मिळाली.

विद्यार्थ्यांनी वापरलेल्या सृजनशील वस्तू, कलाकृती आणि दृश्य-प्रयोगांनी कार्यक्रमात विशेष आकर्षण निर्माण केले.शाळेतील विविध उपक्रमांचे दिमाखदार सादरीकरण प्रेक्षकांना थक्क करणारे ठरले.कराटे,लाठीकाठी,तलवारबाजी,ढोल-ताशे ,रायफल शूटिंग या प्रत्येक कलागुणांमधून विद्यार्थ्यांनी मेहनत, तन्मयता आणि आत्मविश्वासाचे उत्कृष्ट दर्शन घडवले.संपूर्ण प्रांगणात पालक, नागरिक आणि मान्यवरांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणा दरम्यान आनंद, अभिमान आणि टाळ्यांचा गजर अशी वातावरण निर्मिती झाली. सांस्कृतिक स्नेहसंमेलनाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मनीषा हांडे किरण मुळे यांनी केले.तर आभार प्रदर्शन धनश्री गवळी यांनी व्यक्त केले.
कलाशिक्षक रोशन बनकर यांनी आकर्षक सजावट, वस्तू आणि चित्र-आकृतींच्या माध्यमातून प्रत्येक नृत्याची उंची अधिक वाढवली. कार्यक्रमात ‘सामाजिक संदेश आणि कलात्मकता’ यांचा सुंदर संगम पाहायला मिळाले.
शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रम अत्यंत नियोजनबद्ध पार पडला.समन्वयिका जयश्री कुंजीर आणि श्वेता कोकणे यांचेही सहकार्य लाभले.
शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी एकजुटीने मेहनत घेत विद्यार्थ्यांना उजाळा देणारा, प्रेरणादायी आणि अविस्मरणीय असा सांस्कृतिक सोहळा साकारला. ‘Social Awareness & Spreading Kindness’ या थीमने विद्यार्थ्यांनी समाजातील गंभीर प्रश्नांना कलात्मक रुपातून उजागर केले.दयाळूपणा, जबाबदारी, पर्यावरण-जागरूकता आणि नैतिक मूल्यांची जपणूक — या सर्वांचे सुंदर मिश्रण असलेला व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूलचा सांस्कृतिक स्नेहसंमेलन २०२५- २६हा कार्यक्रम सर्वांच्या हृदयात कायमचा कोरला गेला.