आवाज महाराष्ट्राचा

जन माणसाचा हक्काचा आवाज

मॉडर्नमध्ये वन्यजीव व मानव संघर्ष याबाबत मार्गदर्शन

1 min read

बेल्हे:-सामाजिक वनीकरण परिक्षेत्र जुन्नर ,विभाग पुणे व पंचायत समिती जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव व मानव संघर्ष याबाबत मेजर रमेश खरमाळे यांनी मॉडर्न इंग्लिश स्कूल ,बेल्हे (ता. जुन्नर )येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . यावेळी मॉडर्न इंग्लिश स्कूल बेल्हे चे सीईओ शैलेश ढवळे, विश्वस्त दावला कणसे , मुख्याध्यापिका विद्या गाडगे, उपमुख्याध्यापक के. पी .सिंग ,शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी सैनिक व निसर्गप्रेमी वनरक्षक रमेश खरमाळे म्हणाले की, जागतिक तापमान वाढ, वनांचा होणारा ऱ्हास थांबवण्यासाठी मुलांना पशुपक्षी ,पर्यावरण, वन्यप्राणी यांचे आपल्या जीवनातील महत्त्व तसेच पर्यावरण संतुलनासाठी त्याची असणारी गरज यांचे महत्त्व पटवून दिले.

नैसर्गिक असमतोल झाल्यामुळे वाढलेली बिबट संख्या यामुळे निर्माण झालेल्या सामाजिक प्रश्नाबाबत बिबट्यापासून काळजी कशी घ्यावी हे अगदी सहजपणे हसत खेळत विद्यार्थ्यांना पटवून दिले. शाळेत जा ये करताना समूहाने का जावे, एकटे का जाऊ नये, अंधारात बाहेर का फिरू नये, घर परिसर स्वच्छ का ठेवावा, पालकांनी शेतात काम कसे करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या उपक्रमाचे संस्थेचे संस्थापक सावकार गुंजाळ, अध्यक्ष गोपीनाथ शिंदे व विश्वस्त मंडळाने अभिनंदन केले.

मेजर रमेश खरमाळे यांनी मागील ८६ दिवसात ५६१ प्राथमिक व माध्यमिक शाळांना मार्गदर्शन केले आहे.


“बिबट्याचे लहान मुलांवर हल्ले वाढले आहेत. योग्य मार्गदर्शन केल्यास मुले दक्षता घेतील, मुलांवर होणारे हल्ले टळतील ,शालेय जीवनात विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी जनजागृती होईल हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.”

 

मेजर रमेश खरमाळे

निसर्गप्रेमी वनरक्षक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे