औरंगपूर येथे मोफत नेत्र तपासणी
1 min read
वडगाव कांदळी:-आदर्श सरपंच कल्पनाताई वैभवशेठ काळे व वैभवशेठ काळे मित्र परिवार आयोजित मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर रविवार दि.२८/१२/२०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत हनुमान मंदिर, औरंगपूर (ता. जुन्नर)येथे आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरात मोफत नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मोफत रक्तदाब तपासणी, मोफत चष्मे वाटप, मोफत मधुमेह तपासणी, शस्त्रक्रियेदरम्यान लेन्स, रक्त तपासणी, इसीजी, ओटीजी, रुग्णांना मोफत चष्मा वाटप व नेत्र ड्रॉप या सुविधा देण्यात येणार आहे. यासाठी पोपट कामठे ,मोहन डुकरे, नवनाथ डुकरे, आकाश वाघ, अमित डुकरे, जिवन कामठे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन वैभवशेठ काळे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.