नगदवाडीत १०लक्ष रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन
1 min read
वडगाव कांदळी:- नगदवाडी (ता. जुन्नर )येथील हनुमान मंदिर परिसरामध्ये भक्त निवास बांधण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांच्या विशेष प्रयत्नातून विविध विकासकामांतर्गत दहा लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून मंजूर झालेल्या दहा लक्ष रुपयांच्या निधीत खोल्यांच्या कामाचे भूमिपूजन पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाले .यावेळी कांदळी गावचे माजी आदर्श सरपंच बाळासाहेब बढे, उद्योजक संभाजी चव्हाण, खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अशोक बढे,कांदळी गावच्या सरपंच डॉ. पल्लवी भोर, ग्रामपंचायत सदस्य अनिल भोर ,निलेश बढे, कृष्णा बढे,ऋषिकेश भोर, विनायक गुंजाळ ,नंदा बढे, रेश्मा फुलवडे ,साधना भोर, माया बढे ,वडगाव कांदळीचे माजी सरपंच रामदास पवार, कांदळी चे माजी उपसरपंच सुदर्शन बढे ,नगदवाडी सोसायटीचे माजी चेअरमन सुरेश बढे,रघुनाथ गुंजाळ, हरीशेठ भोर ,दयानंद बढे, गणेश भोर ,पिराजी भोर, शांताराम बढे,दिलीप बढे, बबन बढे,वसंत कोकणे, बाळू बढे ,अक्षय बढे,शांताराम बढे, जितेंद्र फुलवडे ,गोरक्ष नेंद्रे, रवी बढे,बाळू बढे ,स्वप्निल शेंडे ,दिलीप भोर, अमोल घाडगे ,अतुल बढे,सागर बढे, बाळू शेंडे, सुरेश शेंडे, ज्ञानेश्वर शेंडे ,अरुण बढे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.