आवाज महाराष्ट्राचा

जन माणसाचा हक्काचा आवाज

नगदवाडीत हरी कीर्तन महोत्सव

1 min read

वडगाव कांदळी:-लोकमान्य गणेशोत्सव मित्र मंडळ नगद वाडी तालुका जुन्नर आयोजित गुरुवार दिनांक २५ ते सोमवार दिनांक २९ डिसेंबर २०२५ या कालावधीत हरी किर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सोहळा कीर्तनाचा सोहळा आनंदाचा नगदवाडी बस स्टँडजवळ साजरा होणार आहे. या कालावधीत पहाटे ४ ते ६ वाजता काकड आरती, सायंकाळी ६ ते ७ वाजता हरिपाठ, रात्री ७ ते ९ वाजता हरी किर्तन रात्री नऊ नंतर महाप्रसाद व हरिजागर होणार आहे.

गुरुवार (दि२५)रोजी संगीत अलंकार ह .भ. प. नेहाताई भोसले साळेकर पुणे यांचे कीर्तन होणार आहे .शुक्रवार (दि२६) मुक्ताई सेवक ह. भ .प. विशाल महाराज खोले मुक्ताईनगर यांचे हरिकीर्तन, शनिवार (दि २७) आवाजाचे जादूगार ह. भ. प. पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणा, रविवार( दि.२८)विनोदाचार्य ह. भ.प .प्रकाश महाराज साठे बीड यांचे कीर्तन होईल सोमवार (दि.२९) रोजी गुरुवर्य कृष्णकृपांकित विकासानंद महाराज मिसाळ यांचे काल्याचे किर्तन होणार आहे या हरिकीर्तन सोहळ्यासाठी परिसरातील दानशूर व्यक्तींचे सहकार्य लाभले असून भाविकांनी या कीर्तन सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन लोकमान्य गणेशोत्सव मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे