आवाज महाराष्ट्राचा

जन माणसाचा हक्काचा आवाज

राष्ट्रीय सेवा योजनेच्या हिवाळी विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप कार्यक्रम उत्साहात संपन्न

1 min read

वडगाव कांदळी:- ग्रामोन्नती मंडळाचे, गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, नारायणगाव (ता. जुन्नर) आणि निर्मलग्राम वडगाव (कांदळी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा समारोप कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या शिबिरामध्ये कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावीचे 50 विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांनी गावातील व सर्व रस्त्यांची स्वच्छता केली. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, या कार्यक्रमांतर्गत वनराई बंधारा बांधला. स्मशानभूमीतील सर्व स्वच्छता या विद्यार्थ्यांनी केली. या शिबिरामध्ये अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. विद्यार्थ्यांचे पालकसुद्धा यानिमित्ताने मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावातील ग्रामस्थांनी या शिबिरासाठी चांगले सहकार्य केले. त्याचबरोबर गावातील अनेक दानशूर व्यक्तींनी व संस्थांनी विद्यार्थ्यांसाठी लागणारे सर्व साहित्य विनामूल्य उपलब्ध करून दिले. या शिबिरासाठी ग्रामपंचायतीचे मोलाचे योगदान लाभले. समारोप कार्यक्रमासाठी गावातील अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित होते.

ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषिरत्न अनिल मेहेर यांनी विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाचे निमित्ताने शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी दुसऱ्यांसाठी जीवन जगले पाहिजे. ग्रामीण भागात सौरऊर्जेला प्राधान्य दिले पाहिजे. कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर काम करण्याची गरज आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणे आवश्यक आहे. संगणक साक्षरता ग्रामीण भागात रुजली पाहिजे. गावातील प्रत्येकाने वेगवेगळी कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत आणि पर्यावरणातील हरितऊर्जेचा वापर आधुनिक शेतीसाठी केला पाहिजे, असे विचार त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांसमोर मांडले.

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि बिरोबा महाराज ग्रामविकास ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष बबन लांडगे यांनी या विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाबद्दल तोंड भरून कौतुक केले. अशा प्रकारची शिबिरे आयोजित केल्यास विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळतो आणि त्यांच्यामध्ये सामाजिक जाणीव निर्माण होऊन चांगले श्रमसंस्कार या विद्यार्थ्यांवर होतात, असे विचार त्यांनी व्यक्त केले. या शिबिरासाठी कार्यक्रम अधिकारी प्रा. संतोष देशपांडे यांनी खूप कष्ट घेतले तसेच या गावचे भूमिपुत्र आणि ग्रामोन्नती मंडळाच्या व्यावसायिक विभागाचे प्रमुख डॉ. सत्यवान थोरात यांनी अतिशय उत्तम समन्वयकाची भूमिका पार पाडून कार्यक्रम यशस्वी केला. या कार्यक्रमासाठी ग्रामोन्नती मंडळाचे उपाध्यक्ष शशिकांत वाजगे, प्रगतीशील शेतकरी अजित वालझाडे, गावच्या सरपंच उल्का पाचपुते, उपसरपंच संजय खेडकर, ग्राम विकास ट्रस्टचे सचिव बबन पाचपुते, बिरोबा दूध संस्थेचे चेअरमन संदेश पाचपुते, रियाज पठाण, मंगेश पाचपुते, ग्राम विकास ट्रस्टचे उपाध्यक्ष रामदास निलख, ग्रामपंचायत सदस्य पंढरीनाथ पाचपुते, मधुकर कुऱ्हाडे, शोभा पाचपुते, रंगनाथ पाचपुते, माजी सरपंच ज्ञानेश्वर निलख, पोलीस पाटील बाळासाहेब पाचपुते, रवींद्र पाचपुते, भास्कर पाचपुते, ग्र आकाश लांडगे, अनंथा बंडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे मा.उपप्राचार्य प्रा. हनुमंत काळे, पर्यवेक्षक प्रा. संजय वलटे, प्रा. नितीन पोखरकर. प्रा. अरुण हिंगे आदी मान्यवर या समारोप कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी उपमुख्याध्यापिका मानसी भालेराव ,पर्यवेक्षक सुनील ढवळे, पर्यवेक्षिका निर्मला भुजबळ ,अनुपमा पाटे तसेच राष्ट्रीय सेवा योजना सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा. साहेबराव गाळव , प्रा. जयश्री कोल्हे, प्रा. वनिता जगताप, प्रा. शैलेश कावळे, प्रा. मनीषा देशमुख, प्रा. ललिता व्यवहारे यांनी नियोजन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सत्यवान थोरात यांनी, सूत्रसंचालन प्रा. रूपाली जरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. संतोष देशपांडे यांनी केले. गावाबरोबर जोडलेले स्नेहाचे आणि आपुलकीचे संबंध जोपासत विद्यार्थ्यांनी साश्रू नयनांनी ग्रामस्थांचा निरोप घेतला. अशी माहिती मुख्याध्यापिका सुषमा वाळिंबे यांनी दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे