तब्बल ३८वर्षानंतर संपन्न झाला माजी विद्यार्थी स्नेह मेळावा
1 min read
वडगाव कांदळी:- हिंदमाता विद्यालय वडगाव (कांदळी) तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील माजी विद्यार्थी एसएससी बॅच १९८६- ८७यांचा स्नेह मेळावा व गुरुजनांचा सन्मान कार्यक्रम अतिशय उत्साहात माई पार्टी हॉल१४ नंबर (कांदळी) येथे नुकताच पार पडला. तब्बल ३८वर्षानंतर शिक्षक व माजी विद्यार्थी एकत्र आले.
कित्येक मित्र मैत्रिणी तब्बल ३८ वर्षानंतर भेटत होते. सुरुवातीला एकमेकांना ओळखणे अवघड जात होते.
या प्रसंगी शिक्षक कोरडे सर, श्री विश्वासराव सर, श्री भागवत सर, ढुस सर, लेंडे सर व लेंडे मॅडम तसेच यांचा सन्मानचिन्ह ट्रॉफी,शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला व कृतज्ञता व्यक्त केली. श्री विश्वासराव सर व श्री कोरडे सर यांनी सर्वांना उत्तम आरोग्यासाठी सल्ला दिला.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माजी विद्यार्थी प्रमुख श्री दत्तात्रय भोर, श्री जगदीश घाडगे, श्री सुनील रोकडे, श्री अशोक भोर, श्री विश्वास बढे यांनी परिश्रम घेतले.
डॉक्टर सुनील पाटील, ॲड. श्री सुभाष म.घाडगे, श्री जगदीश घाडगे यांनी जुन्या आठवणींना उजाळा देऊन मनोगत व्यक्त केले. श्री सुभाष द.घाडगे यांनी प्रास्ताविक केले.
