आळे येथील फार्मसी महाविद्यालयात इंडक्शन प्रोग्रॅम व फ्रेशर्स पार्टी उत्साहात संपन्न
1 min read
वडगाव कांदळी:- आळे येथील फार्मसी महाविद्यालयात प्रथम वर्ष बी. फार्म, एम. फार्म तसेच थेट द्वितीय वर्ष बी. फार्ममध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत व त्यांना महाविद्यालयाच्या शैक्षणिक, व्यावसायिक व संस्थात्मक संस्कृतीची ओळख करून देण्याच्या उद्देशाने इंडक्शन प्रोग्रॅम यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी सौ. किरण नायकोडी, श्री. विकास टेकुडे व श्री. गणपत टेमकर यांना अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी औषधनिर्माण क्षेत्रातील अनुभव, करिअर संधी व व्यावसायिक कौशल्यांच महत्त्व विद्यार्थ्यांसमोर मांडले. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला.
कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. अर्चना कसार मॅडम यांनी केली.
तसेच फ्रेशर्स पार्टी ही देखील द्वितीय वर्ष बी. फार्म विद्यार्थ्यांनी अत्यंत यशस्वीरीत्या आयोजित केली. या आयोजनातून त्यांच्या नेतृत्वगुणांचा व संघटन कौशल्यांचा प्रभावी प्रत्यय आला.
सदर कार्यक्रम संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दुष्यंत गायकवाड सर व प्राचार्य डॉ. सुरेश जाधव सर यांच्या उपस्थितीत पार पडला.
सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री अंकुश शेठ सोनवणे, पदाधिकारी व विश्वस्त यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाच्या शेवटी प्राध्यापक धनश्री गीते मॅडम यांनी उपस्थित मान्यवर, अतिथी, प्राध्यापकवर्ग तसेच विद्यार्थी आयोजकांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. हा कार्यक्रम नवागत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक प्रवासासाठी प्रेरणादायी ठरला.