आवाज महाराष्ट्राचा

जन माणसाचा हक्काचा आवाज

कळसूबाई शिखरावर विद्यार्थ्यांकडून स्वच्छता

1 min read

३० गोण्या कचरा गोळा करून विल्हेवाट

राजूर, दि. ११ (वार्ताहर) महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई आणि परिसराची महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्वच्छता केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ आणि अॅड. एम. एन. देशमुख कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय राजूर यांच्या संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक वारसा स्थळांचे जतन व संवर्धन’ या विषयावर दोन दिवशीय जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

संगमनेर-अकोले तालुक्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कळसुबाई शिखर ते कळसुबाई पायथा अशा अवघड मार्गावरील प्लास्टिक बाटली आणि साहित्य, असा ३० गोण्या कचरा गोळा केला. तो पायथ्यालागड एका ठिकाणी संकलित करून कळसुबाई-हरिश्चचंद्र अभयारण्य वनक्षेत्र भंडारदरा या विभागाकडे जमा करण्यात आला. भारतातून कळसुबाई शिखराला भेट देणाऱ्या पर्यटकांना प्लास्टिक मुक्ती व पर्यावरण संरक्षण समतोल राखण्याचा संदेश दिला. पर्यावरण राखण्यात पर्यटकांची महत्त्वाची भूमिका आहे. हा संदेश देऊन पर्यावरणपूर्वक पर्यटन करावे, असे आवाहन केले.

ही मोहीम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. वाय. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे समन्वयक डॉ. वाल्मिक गिते, डॉ. एल. बी. काकडे, प्रा. जी. एस. कुसमुडे आणि प्रा. योगिता वाकचौरे यशस्वी पूर्ण केले. यासाठी कळसुबाई-हरिश्चंद्र अभयारण्यचे वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय पडवळे, रुपेश गावित, वनरक्षक चंद्रकांत तळपाडे आणि त्यांचे सर्व कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे