संगीता कुऱ्हाडे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
बेल्हे: मॉडर्न इंग्लिश स्कूल, बेल्हे (ता. जुन्नर) या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी नर्सरी ते इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी विविध कला, नृत्य सादर केले. यावेळी किल्ले शिवनेरीचे शिलेदार आमदार शरददादा सोनवणे,जुन्नर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अशोक लांडे, निसर्ग अभ्यासक यश मस्करे, मुंबई आयकर सहआयुक्त श्रुती पटाडे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महादेव शेलार, माजी पंचायत समिती सदस्य अनघा घोडके,समर्थ संकुलाचे वल्लभ शेळके, विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे, मुक्ताई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जानकू डावखर, उद्योजक पंकज कणसे, बेल्हे गावचे उपसरपंच राजेंद्र पिंगट, स्नेहलताई शेळके, अतुल भांबेरे, निलेश कणसे ,कैलास औटी, लहू गुंजाळ,भाऊसाहेब भांबेरे, बबन औटी,संस्थेचे संस्थापक सीए सावकार गुंजाळ, चेअरमन गोपीनाथ शिंदे , सीईओ शैलेश ढवळे, विश्वस्त दावला कणसे, संचालक गणेश गुंजाळ, भास्कर पवार, सुरेश सोनवणे, सागर शिंदे, प्राचार्या विद्या गाडगे, उपप्राचार्य केपी सिंग यांच्या उपस्थितीत मुंबई आयकर सहआयुक्त श्रुती पटाडे व संचालक गणेश गुंजाळ यांच्या हस्ते संगीता कुऱ्हाडे यांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
संगीता कुऱ्हाडे या मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये सुरुवातीपासून ज्ञानदानाचे कार्य करीत असणाऱ्या हरहुन्नरी, कष्टाळू, अध्यापन कार्यामध्ये विशेष परिश्रम घेणाऱ्या शिक्षिका असून यांनी शाळेमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम, शाळेच्या सर्वांगीण विकासात सहभाग आणि महत्त्वपूर्ण कामाच्या माध्यमातून आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला आहे. संगीता कुऱ्हाडे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६ ने सन्मानित करण्यात आल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांमधून आनंद व्यक्त करण्यात आला.