आवाज महाराष्ट्राचा

जन माणसाचा हक्काचा आवाज

जय किसान सेंद्रिय बचत गटाकडून अजितदादांना आदरांजली

1 min read

वडगाव कांदळी:- जय किसान सेंद्रिय कृषी बचत गट येडगाव (ता. जुन्नर) तसेच धर्मवीर संभाजी महाराज बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येडगाव येथील बेंदमळा येथे महिला व पुरुष बचत गटाचे सभासद हजर होते. बचत गटाचे सदस्य शिवाजी नेहरकर यांनी श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या जीवनपटावर नजर फिरवून सर्वांना दुःख सागरात लोटल. त्यांचे विचार सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचे काम करत राहू असे बचत गटाचे अध्यक्ष प्रकाशशेठ नेहरकर सांगितले .यावेळी जुन्नर तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अशोक बढे ,नगदवाडी सोसायटीचे चेअरमन पोपट बढे, सामाजिक कार्यकर्ते योगेश बढे,जय किसान बचत गटाचे उपाध्यक्ष जयसिंग भिसे, गणेश भिसे, गंगाधर भोर यांनी दादांचे विचार व कार्य अजरामर ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी जय किसान सेंद्रिय बचत गटाच्या सभासद महिला व पुरुष तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे