अहिल्यानगर जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ संपन्न
1 min readअहिल्यानगर:- राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडला.

या सोहळ्यात पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करून शिक्षण क्षेत्रासमोरील विविध आव्हानांवर सर्व शिक्षकांशी संवाद साधला. या कार्यक्रमास आमदार श्री. काशिनाथ दाते, श्री. विक्रमसिंह पाचपुते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आनंद भंडारी, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. घार्गे, शिक्षणाधिकारी श्री. भास्कर पाटील, संध्याताई गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते .

प्रत्येक तालुक्यातून आलेल्या प्रस्तावांची गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी (शिक्षण) यांच्यामार्फत पडताळणी होऊन 3 शिक्षक (त्यामध्ये एक शिक्षिका) व एक केंद्रप्रमुख यांचे प्रस्ताव जिल्हा कार्यालयास पाठविण्यात आले. जिल्हास्तरावरून गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी (शिक्षण) व केंद्रप्रमुख यांच्याकडून तालुके बदलून पथक परीक्षण करण्यात आले. त्याचप्रमाणे प्रस्ताव प्राप्त शिक्षक व केंद्रप्रमुख यांची 25 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समितीची बैठक होऊन पथकाकडून प्राप्त 100 गुणांची प्रश्नावली व लेखी परीक्षेचे 25 गुण असे एकूण 125 गुणांपैकी ज्यांना सर्वात जास्त गुण मिळाले अशा प्रत्येक तालुक्यातून एक शिक्षक यांचा प्रस्ताव नाशिक विभागीय आयुक्तांच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला. त्यातून 2024-2025 या वर्षासाठीचे पुरस्कार जाहीर करण्यात आले. विशेष म्हणजे 2023 व 2024 या दोन वर्षांचे पुरस्कार त्या-त्या वेळी जाहीर झाले. परंतु त्याचे वितरण झालेले नव्हते. त्यामुळे आता तीनही वर्षांचे एकत्रित पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
पुरस्कार प्राप्त शिक्षक (2023)
नरेंद्र राठोड (अकोले), सोमनाथ घुले (संगमनेर), सचिन अढांगळे (कोपरगाव), भारती देशमुख (राहाता), सविता साळुंके (श्रीरामपूर), अनिल कल्हापुरे (राहुरी), सुनीता निकम (नेवासा), अंजली चव्हाण (शेवगाव), भागिनाथ बडे (पाथर्डी), एकनाथ चव्हाण (जामखेड), किरण मुळे (कर्जत), जावेद सय्यद (श्रीगोंदा), विजय गुंजाळ (पारनेर), साधना क्षीरसागर (नगर), रावजी केसकर (केंद्रप्रमुख, पारनेर), अशोक विटनोर (केंद्रप्रमुख, श्रीरामपूर).
पुरस्कार प्राप्त शिक्षक (2024)
पुष्पा लांडे (अकोले), संजय कडलग (संगमनेर), पीतांबर पाटील (कोपरगाव), ललिता पवार (राहाता), योगेश राणे (श्रीरामपूर), सुनील लोंढे (राहुरी), सुनील अडसूळ (नेवासा), गोरक्षनाथ बर्डे (शेेवगाव), नामदेव धायतडक (पाथर्डी), बाळू जरांडे (जामखेड), दीपक कारंजकर (कर्जत), स्वाती काळे (श्रीगोंदा), प्रकाश नांगरे (पारनेर), वर्षा कचरे (नगर), ज्ञानेश्वर जाधव (केंद्रप्रमुख शेवगाव).
पुरस्कार प्राप्त शिक्षक (2025)
अनिल डगळे (अकोले), कैलास भागवत (संगमनेर), मंगला गोपाळे (कोपरगाव), मंगल भडांगे (राहाता), सुजित बनकर (श्रीरामपूर), जयश्री झरेकर (राहुरी), रूपाली खेडकर (नेवासा), विठ्ठल देशमुख (पाथर्डी), खंडेराव सोळंके (जामखेड), आबा सूर्यवंशी (कर्जत), नवनाथ वाळके (श्रीगोंदा), सचिन ठाणगे (पारनेर), वर्षा कासार (नगर), विजय भांगरे (केंद्रप्रमुख अकोले), रामदास बाबागोसावी (केंद्रप्रमुख नगर).