आवाज महाराष्ट्राचा

जन माणसाचा हक्काचा आवाज

शिक्षक दाम्पत्याच्या बदलीसाठी संपूर्ण गाव पुणे जिल्हा परिषदेत

1 min read

शिक्षक दाम्पत्याच्या बदलीसाठी संपूर्ण गाव पुणे जिल्हा परिषदेत

दौंड :- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक दाम्पत्य यांची बदली रद्द व्हावी. . यासाठी संपूर्ण गाव आणि वाडया वस्त्या ५० वाहनातुंन जिल्हा परिषदेत धडकल्याची घटना घडली आहे .

सर्व गावाने पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांना कळकळीने अर्ज करूनही पाटील यांनी गावकरी यांचे मागणीकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष केले आहे.

यामुळे पालक संतप्त होऊन बदली रद्द होणारच नसेल तर कायम स्वरुपी शाळेला टाळे ठोकुन कायमची शाळा बंद करण्याचा गावकरी यांचा ठाम निर्धारआहे.

हा सर्व प्रकार घडला आहे दौंड तालुकयातील‌ मिरवडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत.

याबाबत गावकरी यांनी दिलेली अधिक माहिती अशी, येथील शेलारवाडी, मेमाणवाडी शाळेतील शिक्षक दाम्पत्य खेडेकर यांचे बदलीने गावकरी अस्वस्थ झाले.

पाच सहा वर्षांपूर्वी येथील जि.प.प्राथमिक शाळा बंद पडण्याच्या मार्गावर होती.तयावेळी या शाळेत अमर खेडेकर आणि धनश्री खेडेकर हे शिक्षक दाम्पत्य येथे बदलुन आले.या धेय्यवेडया आणी उपक्रम शिव शिक्षक दाम्पत्य यांनी झोकुन देत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत अनेक उपक्रम राबविले विद्यार्थी आणि शाळेची वेगाने सर्वांगिण प्रगती साधली.शैक्षणिक गुणवत्ता, विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये विदयार्थी उत्तीर्ण, अभ्यासक्रमासह कोडिंग, क्रांचिंग, जर्मन व फ्रेंच भाषा शिकवणे, अँबकस,वेब डेव्हलपमेंट, तर याही पुढे इस्रो व नासा या प्रसिद्ध ठिकाणी संशोधन करण्यासाठी येथील विदयाक्षथी निवड, शाळा सुधारली, प्रगती झाली, येथे आज दोनशे पट आहे.शैक्षणिक, वैज्ञानिक आणि विद्यार्थी सर्वांगिण विकास, शाळेची प्रगती. यामूळे विद्यार्थी आणि पालक शिक्षक यांचे अतुट स्नेह निर्माण झाला.

या शिक्षक दाम्पत्य यांनी येथे खुप खुप कष्ट घेतले आहे.

या शिक्षक दाम्पत्य यांच्या बदलीने गावकरी अस्वस्थ झाले तर विदयारथी सैरावैरा झाले.विदयारथयांनीआपल्या पालकांकडे आग्रह धरला.आमचया गूरूजीची बदली रद्द करा.एक एक पालक करता गाव, वाड्या वस्त्या एकत्र आले.आणी बदलीसाठी भगीरथ प्रयत्न करु लागले आहेत.

प्रशासन सोई ऐवजी गावकरी आणि विद्यार्थी यांचे म्हणने ऐकुन घेवून सदर बदृली रद्द करावी.अशी ग्रामस्थ मागणी करीत आहे.

काळ बदलला तसे शिक्षकही बदलुन लागले आहेत. पुर्वी शिक्षक गावचे आदर्श असतं. हल्ली चांगले आणखी धेय्यवेडे शिक्षक मिळणे,सर्व गुण संपन्न विद्यार्थी घडवणे. हे दुर्मीळच.परतु आम्ही नशिबवान, आमच्याही पेक्षा गावची मुले अधिक नशिबवान, आम्हाला खेडेकर दाम्पत्य लाभले आहे.तयाची बदली विचारही करवत नाही. बदली रद्द करण्यात यावी. अन्यथा आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाळे ठोकुन कायमची बंद करु.असा निर्वाणीचा इशारा सरपंच सागर शेलार यांनी दिला आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे