साईलक्ष्मी पतसंस्थेस जुन्नर सहकार भूषण पुरस्काराने सन्मानित
1 min readवडगाव कांदळी:- साईलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित वडगाव कांदळी (ता.जुन्नर )या पतसंस्थेस जुन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनच्या कार्यालयाच्या उद्घाटन समारंभ व वार्षिक सभेत जुन्नर सहकार भूषण २०२५ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था विभागाचे अप्पर निबंधक श्रीकृष्ण वाडेकर व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जुन्नरचे डॉ.गजेंद्र देशमुख यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .यावेळी जुन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष अमित बेनके, उपाध्यक्ष गुलाब नेहरकर, कार्याध्यक्ष महादेव वाघ, सचिव भास्कर बांगर, मुख्य कार्यकारी अधिकारी मोहन मुळे ,संभाजी चव्हाण, विशाल जुन्नरचे अध्यक्ष अरुण पारखे, श्री पांडुरंग पतसंस्था निमगाव चे चेअरमन संदिपान पवार इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

यावेळी साईलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन प्रा.श्रीकांत पाचपुते ,उपाध्यक्ष रामदास पवार ,सचिव पोपट बढे, खजिनदार मंगेश घाडगे, मार्गदर्शक बबन घाडगे, दत्तात्रय भोर, संचालक माऊली लांडगे, करीम इनामदार ,नवनाथ थोरात ,नीलकंठ भोर, सतीश पाचपुते ,अतुल खेडकर, माऊली लांडगे ,उत्तम लांडगे, सुनील निलख,लता भोर ,पूजा मुटके, व्यवस्थापक मच्छिंद्र भोर ,पूजा भोर, स्नेहल बढे, किरण ढोबळे, नितीन पाचपुते यांच्यासह डॉ. सत्यवान थोरात, प्रसाद पवार, कृष्णा भोर, अनिकेत पाटे ,आशिष शिंदे, नवनाथ भोर ,सुखदेव भोर उपस्थित होते.

साईलक्ष्मी पतसंस्थेस १० ते २५ कोटी ठेवी असणाऱ्या गटातून जुन्नर सहकार भूषण २०२५या पुरस्कारासाठी तृतीय क्रमांकात निवड करण्यात आली असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन प्रा. श्रीकांत पाचपुते यांनी दिली. साईलक्ष्मी पतसंस्थेची ७ वर्षांपूर्वी स्थापना झाली असून १ हजार ५१९सभासद असून ठेवी १० कोटी ५१ लाख रुपयांच्या असून संस्थेत २०२४- २५ मध्ये ४२ लाख रुपयांचा नफा झाला आहे. संस्थेस स्थापनेपासून ऑडिट वर्ग अ असून सभासदांना १५% लाभांश व दिवाळी भेटवस्तू देण्याची परंपरा स्थापनेपासून कायम असणारी पतसंस्था आहे .

साईलक्ष्मी पतसंस्थेत जुन्नर सहकार भूषण पुरस्कार मिळाल्याने पतसंस्थेच्या कारभाराचा, सभासदांच्या विश्वासाचा, संचालक मंडळाच्या सहकार्याचा गौरव असल्याचे चेअरमन प्रा. श्रीकांत पाचपुते यांनी सांगितले.
