नगदवाडी सोसायटीची वार्षिक सभा संपन्न
1 min readनगदवाडी सोसायटीची वार्षिक सभा संपन्न
वडगाव कांदळी:- नगदवाडी (ता. जुन्नर )येथील नगदवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची ६५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन सुरेश मारुती बढे यांच्या अध्यक्षतेखाली महिला अस्मिता भवन नगदवाडी येथे पार पडली. यावेळी विषय पत्रिकेवरील सर्व विषयावर सविस्तर चर्चा होऊन बहुमताने मंजुरी देण्यात आली.

यावेळी व्हाईस चेअरमन दिनकर कुतळ, संचालक शिवशंकर मांडे, विश्वास बढे ,गणेश भोर, पोपट बढे, सिद्धार्थ बढे, देवराम थोरात ,संगीता बढे, अलका भोर, सचिव अमोल गुंजाळ ,दत्तात्रय थोरात, लेखापरीक्षक एन. एम. शेटे हे उपस्थित होते.

यावेळी कांदळी गावचे माजी आदर्श सरपंच बाळासाहेब बढे , माजी चेअरमन अशोक बढे, कांदळीचे माजी उपसरपंच अनिल भोर, सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ भोर, तान्हाजी बढे, महेश बढे, पिराजी भोर ,विलास बढे ,अशोक जगताप, श्रीधर कुतळ ,बाळू बढे ,शांताराम बढे ,गंगाराम भोर, गणेश भोर, देवराम भोर, अरुण भोर, आजाबा भोर, निवृत्ती बढे ,सतीश बढे, रघुनाथ बढे ,रवी काळे, सखाराम बढे, अनंथा बढे, रत्नाकर जगताप, मंगेश बढे, उत्तम शिंदे ,बबन कुतळ ,सुरेश कुतळ, कारभारी भोर ,गणेश कुतळ, दयानंद बढे , कोंडीभाऊ बढे, वसंत काळे ,धोंडीभाऊ काळे, प्रवीण बढे, रवींद्र बढे, वैभव बढे ,मच्छिंद्र कुतळ ,अशोक कुतळ ,राजू नायडू ,जयसिंग बढे ,सोमनाथ कुतळ,बाबाजी कोकणे ,बाबाजी बढे ,दिलीप बढे, मारुती शिंदे, वसंत कोकणे, संजय बढे , काशिनाथ शिंदे ,ज्ञानेश्वर बढे, नारायण शेंडे , दिनकर बढे , सुनील कुतळ, चंद्रभागा बढे, सुशीला बढे ,यमुनाबाई बढे यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगदवाडी सोसायटीचे ९७१ सभासद असून कर्ज वाटप ३ कोटी ५२ लाख रुपयाचे आहे.
वार्षिक सर्वसाधारण सभेच्या चर्चेमध्ये कारभारी भोर, निवृत्ती बढे,विलास बढे, सोमनाथ कुतळ, गणेश कुतळ, दयानंद बढे ,विकास बढे ,गंगाराम भोर, सुरेश कुतळ ,पिराजी भोर यांनी सहभाग घेतला.

अहवाल वाचन सचिव अमोल गुंजाळ यांनी केले .