वडगाव (कांदळी) मध्ये भक्ती शक्ती चा प्रत्यय
वडगाव (कांदळी) मध्ये भक्ती शक्ती चा प्रत्यय
वडगाव कांदळी: – राष्ट्रपती पारितोषिक विजेते आदर्श निर्मल ग्राम वडगाव (कांदळी) येथे निवरात्रोत्सवानिमित्त दसऱ्याच्या मुहुर्तावर देवीच्या विसर्जन मिरवणुकीत भक्ती शक्ती चा अनोखा संगम पहावयास मिळाला; सायंकाळी ५:०० वाजता चालू झालेली विसर्जन मिरवणूक रात्री ९:३० वाजेपर्यंत सुरू होत्या.

दरम्यानच्या काळात आदर्श मंडळ पुरस्कार विजेत्या क्रांतिवीर मित्र मंडळ, भोरवाडी च्या नवरात्र देवी विसर्जन मिरवणुकीत जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके यांनी उपस्थिती दाखवत दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या व मंडळाला पुणे जिल्हा ग्रामीण विभागातून आदर्श मंडळ पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले; मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या हस्ते अतुल बेनके यांचा सन्मान करण्यात आला; मिरवणुकीत भोरवाडी मधील असंख्य महिला देवीच्या गाण्यांच्या तालावर फेर धरून नाचत होत्या व फुगड्यांसारखे अनेक प्रकारचे फेर धरून मनसोक्त आनंद घेत होत्या; उत्तरोत्तर मिरवणूक जस जशी पुढे सरकत होती त्यावेळी भोरवाडी च्या खंडोबा मंदिर चौकात क्रांतिवीर महिला ग्रुप च्या लेझीम पथकाने कु. क्षितिजा भोर हिच्या मार्गदर्शनाखाली अनेक प्रात्यक्षिके सादर केली.

उत्तरार्धात वडगाव मधील मारुती मंदिरापुढे तर जणू भक्ती शक्ति चा संगम झाल्याचा भास होत होता त्याला कारण होते क्रांतिवीर मित्र मंडळ, भोरवाडीची देवी मिरवणूक आणि वडगाव (कांदळी) मधील सतिमाता आणि तुळजाभवानी माता नवरात्रोत्सव मंडळाची देवी मिरवणूक जेव्हा मारुती मंदिर चौकात जेव्हा एकमेकींच्या जेव्हा जवळ आल्या तेव्हा सतिमाता, तुळजाभवानी माता मिरवणुकीत कोंडाजीबाबा डेरे आश्रमातील बाल भजन मंडळातील बाल वारकऱ्यांनी टाळ मृदुगाच्या ठेक्यावर भजन म्हणत फेर धरला त्याच सुमारास क्रांतिवीर महिला ग्रुप च्या महिला भगिनींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित लेझीम कला सादर करून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले आणि तिथेच खरा भक्ती शक्ती चा संगम घडून आल्याने भारावून गेलेल्या नारायणगाव पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी गावातील या दोन्ही मंडळे व क्रांतिवीर महिला ग्रुप चे कौतुक करून खऱ्या अर्थाने ग्रामीण विभागात क्रांतिवीर मित्र मंडळ आदर्श मंडळ पुरस्कार विजेते असल्याबद्दल कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आणि या विसर्जन मिरवणुकी साठी क्रांतिवीर मंडळाच्या वतीने निमंत्रित प्रमुख पाहुणे म्हणून नारायणगाव पोलीस स्टेशनचे एपीआय महादेव शेलार व त्यांचे सर्व सहकारी व मनोहर पटाडे मिरवणूक पाहण्यासाठी उपस्थित होते; त्यांचा सन्मान क्रांतिवीर मंडळ भोरवाडी चे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सभासदांच्या हस्ते करण्यात आला.
मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोपट मोहरे, बनकर व गावचे पोलीस पाटील बाळासाहेब पाचपुते यांनी विशेष लक्ष दिले. मिरवणूक कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वडगाव (कांदळी) मधील सर्व नवतरुण व मित्र परिवाराने विशेष प्रयत्न केले. अशी माहिती क्रांतिवीर मंडळाचे खजिनदार गणेश शिंदे यांनी दिली.