आवाज महाराष्ट्राचा

जन माणसाचा हक्काचा आवाज

व्ही. जे .स्कूलमध्ये क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न

1 min read

व्ही. जे .स्कूलमध्ये क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न

वडगाव कांदळी :-विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूल, नगदवाडी कांदळी (ता. जुन्नर) येथे वार्षिक “क्रीडा महोत्सव – Annual Sports Day” मोठ्या जल्लोषात, उत्साहात आणि खेळभावनेच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

विद्यार्थ्यांमधील क्रीडागुण, संघभावना, शिस्त, चिकाटी व निरोगी स्पर्धात्मक वृत्ती विकसित व्हावी, हा या महोत्सवामागील मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाच्या प्रांगणात देवी सरस्वती पूजनाने मंगलमय वातावरणात झाली.

या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून हरिश्चंद्र नरसोडे उपस्थित होते.

तसेच पाहुणे म्हणून रमेश खरमाळे, तसेच

विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुशशेठ सोनवणे,

खजिनदार शिवाजी बांगर,

विश्वस्त संतोष पारखे,

विश्वस्त विक्रांत काळे,

सी.ई.ओ. दुष्यंत गायकवाड ,

मान्यवर हरिभाऊ नामदेव कोरडे तसेच पी.टी.ए. कमिटीचे उपाध्यक्ष किशोर काकडे व सदस्य सचिन बढे हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचा शुभारंभ विद्यार्थ्यांच्या मशाल रन ने झाला. त्यानंतर झालेल्या Walk with Flag, Oath Taking आणि Aerobics Performance या प्रभावी सादरीकरणांनी उपस्थित मान्यवरांची वाहवा मिळवली.

धावण्याच्या शर्यती, क्रिकेट, कबड्डी, खो-खो, फुटबॉल यांसारख्या विविध स्पर्धांनी मैदान रंगून गेले आणि सर्वत्र टाळ्यांचा गजर व जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.

विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट खेळकौशल्यामुळे वातावरणात उत्साह, आनंद आणि विजयी स्पर्धात्मक ऊर्जा पसरली.

विजेत्या खेळाडूंना ट्रॉफी, पदकं आणि प्रमाणपत्रं देऊन गौरविण्यात आले.

उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या यशामागील त्यांची मेहनत, शिस्त आणि चिकाटीचा विशेष गौरव केला.

मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन करताना सांगितले. -खेळ ही केवळ स्पर्धा नसून जीवनशैली आहे. ती विद्यार्थ्यांना शिस्त, आरोग्य आणि सहकार्याचे खरे मूल्य शिकवते.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे पालकांसाठी आयोजित केलेले मनोरंजक खेळ.

संगीत खुर्ची, बॉल बॅलन्सिंग अशा खेळांमुळे विशेषतः महिला पालकांसाठी हा दिवस आनंदाचा आणि संस्मरणीय ठरला.

पालक, शिक्षक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत विजयी जल्लोषात क्रीडा महोत्सवाची सांगता करण्यात आली.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शाळेच्या समन्वयिका जयश्री कुंजीर व श्वेता कोकणे यांच्यासह सर्व शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले.

क्रीडा शिक्षक अमेय देशमुख व अशोक हके यांच्या नेतृत्वाखाली सर्व सहकारी शिक्षकांनी आपापल्या जबाबदाऱ्या कुशलतेने पार पाडून संघभावनेचे उत्तम उदाहरण घालून दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनिषा हांडे व किरण मुळे यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन स्वप्नाली भोर यांनी केले.

खेळाचे महत्त्व अधोरेखित करणारी आकर्षक रांगोळी शिक्षिका धनश्री गवळी व शितल वळसे यांनी साकारली, तर कलाशिक्षक रोशन बनकर यांनी फलकलेखनाने कार्यक्रमाला कलात्मक स्पर्श दिला.

संपूर्ण कार्यक्रमात शिक्षकांचे सुयोग्य नियोजन, टीमवर्क आणि समर्पण यांचे अप्रतिम दर्शन घडले.

या उपक्रमास विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुशशेठ सोनवणे तसेच सी.ई.ओ. दुष्यंत गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे