आवाज महाराष्ट्राचा

जन माणसाचा हक्काचा आवाज

व्ही .जे. स्कूलमध्ये दीपावली उत्सव जल्लोषात साजरा

1 min read

वडगाव कांदळी :-विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूल, नगदवाडी ,कांदळी येथे पर्यावरणपूरक पद्धतीने दिवाळी सेलिब्रेशन आनंदमय वातावरणात संपन्न झाले.

“हिरवी दिवाळी – निरोगी दिवाळी” या संकल्पनेला अनुसरून विद्यार्थ्यांनी पारंपारिक दीपोत्सवाला नवे कलात्मक रूप दिले. शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक परंपरा जपत विविध प्रकारचे किल्ले समूहाने आकर्षक पद्धतीने उभारून त्यातील सृजनशीलतेचा व कलात्मकतेचा पुरावा दिला.

तसेच विद्यार्थ्यांनी इको–फ्रेंडली रांगोळ्यांचे मनमोहक प्रदर्शन साकारले. ” Health is Wealth”, “आपले आरोग्य ही आपली सर्वोत्तम संपत्ती आहे” अशा विविध संदेशांतून, वैयक्तिक व सामाजिक जाणीव जागवली. मातीच्या दिव्यांची सजावट, आकाश कंदील, फुलांची तोरणे व नैसर्गिक सजावटीमुळे वर्ग व शालेय परिसर उजळून निघाला.

शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे तसेच समन्वयिका व सर्व शिक्षक यांनी मिळून सर्वप्रथम गणपती पूजन, सरस्वती पूजन व दीपोत्सवातील सर्व देवतांचे पूजन करून दीपोत्सवाची सुरुवात विद्यार्थ्यां समवेत केली.

शाळेच्या शिक्षिका , पुनम नरवडे यांनी महाराष्ट्रातील विविध सणसमारंभांपैकी भव्य स्वरूपातील सण म्हणजे “दिवाळी” हा दीपोत्सव आणि त्यातील वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी ,लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा/ पाडवा व भाऊबीज या दिवसांचे पौराणिक महत्त्व विद्यार्थ्यांना उत्तम पद्धतीने समजावून सांगितले.

तसेच विद्यार्थिनी कुमारी कीर्ती गुंजाळ हिने देखील उत्तम पद्धतीने दिवाळी सणाचे महत्त्व समजावून सांगितले.पालक, शिक्षक व मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या उत्सवात सर्वत्र उत्साह, सौंदर्य आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश झळकत होता.

शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले की – “प्रत्येक सण हा आनंदासोबत जबाबदारीची जाणीव करून देतो. विद्यार्थ्यांनी किल्ले व रांगोळ्यांच्या माध्यमातून सणाचे खरे सौंदर्य आणि संस्कृतीचे संवर्धन दाखवून दिले.” सोबतच विद्यार्थ्यांना निरोगी व आरोग्यदायी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ही दिल्या.

दिवाळीच्या शुभेच्छा देत हा प्रकाशोत्सव आनंदमयी वातावरणात संपन्न करण्यात आला.या उत्सवासाठी विशाल जुन्नर सेवा मंडळाचे सन्मा. अध्यक्ष अंकुशशेठ सोनवणे व सी.ई.ओ. श्री . दुष्यंत गायकवाड यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे