आवाज महाराष्ट्राचा

जन माणसाचा हक्काचा आवाज

नगदवाडी केंद्रशाळेत नवनियुक्त केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार

1 min read

वडगाव कांदळी: – नगदवाडी (ता-जुन्नर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेत पदोन्नतीने रुजू झालेल्या नवनियुक्त केंद्रप्रमुख वनिता बाळकृष्ण हांडे व नवनियुक्त मुख्याध्यापिका उज्वला गुलाबराव बोऱ्हाडे यांच्या सत्कार सोहळ्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले अशी माहिती नगदवाडी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश बाळासाहेब बढे यांनी दिली.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नगदवाडी या ठिकाणी १५ वर्षे मुख्याध्यापक पदी काम पाहणारे सखाराम शेंडकर यांची बेल्हे या ठिकाणी बदली झाल्याने मुख्याध्यापक पदी उज्वला बोऱ्हाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


सत्कार सोहळ्यात नगदवाडी केंद्राच्या नवनियुक्त केंद्रप्रमुख वनिता हांडे व केंद्रशाळेच्या नवनियुक्त मुख्याध्यापिका उज्वला बोऱ्हाडे यांचा शाल,पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन शाळा व्यवस्थापन समिती नगदवाडी,शाळा सल्लागार समिती नगदवाडी,शिक्षक पालक संघ,माता पालक संघ,सखी सावित्री समिती,विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती,महिला तक्रार निवारण समिती,माजी विद्यार्थी संघ व ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.


नवनियुक्त केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांना कांदळी गावचे माजी आदर्श सरपंच बाळासाहेब बढे, जुन्नर तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अशोक बढे, सामाजिक कार्यकर्ते तान्हाजी बढे ,महेश बढे,ग्रामपंचायत सदस्य अनिल भोर ,निलेश बढे ,सोसायटीचे चेअरमन सुरेश बढे , व्हाईस चेअरमन दिनेश कुतळ,संचालक विश्वास बढे ,सिद्धार्थ बढे, रघुनाथ बढे यांनी शुभेच्छा दिल्या .या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश बढे,उपाध्यक्ष भावना बढे,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य संगिताताई बढे,अक्षदा जाधव, दयानंद बढे,विलास बढे,रवींद्र काळे,संतोष बढे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शिक्षक मंगेश मेहेर,पंडित चौगुले,निलेश शेलार,विद्या वाघ,सुप्रिया अभंग,आशा आरेकर,उज्वला कांबळे आदि शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.


सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाचे नियोजन नगदवाडी गावातील शाळा व्यवस्थापन समिती,शाळा सल्लागार समिती,शिक्षक पालक संघ,माता पालक संघ,सखी सावित्री समिती,विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती,महिला तक्रार निवारण समिती व माजी विद्यार्थी संघ यांच्या वतीने करण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे