आवाज महाराष्ट्राचा

जन माणसाचा हक्काचा आवाज

बोरी खोडद जिल्हा परिषद गटात कल्पना काळेंना मतदारांची पहिली पसंती

1 min read

वडगाव कांदळी:- जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. अनेक इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे तिकिटासाठी मागणी केली आहे. मतदारसंघात जनसंपर्क वाढविण्यावर भर दिला जात आहे. परंतु बोरी खोडद या जिल्हा परिषद गटात मात्र कार्यकर्ते कल्पना वैभव काळे यांना निवडून आणण्याच्या विचारावर ठाम आहेत.

कल्पना वैभव काळे या बोरी खुर्द (साळवाडी) गावचा विद्यमान सरपंच आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळात बोरी खुर्द मध्ये अनेक रस्त्यांची कामे मार्गी लावली आहे .शिक्षण ,आरोग्य, रस्ते, वीज, महिला सबलीकरणात त्यांनी गावात महत्त्वपूर्ण बदल केले आहे. त्यांना पती शिरूर लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष वैभव काळे यांची समाजकारणात बहुमूल्य साथ लाभली आहे. तर सासरे बोरी खुर्द चे माजी सरपंच कै. पांडुरंग काळे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून शरदचंद्र पवार , अजित दादा पवार व कै.वल्लभशेठ बेनके यांच्या मार्गदर्शनाखाली भांडुप मुंबई मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांनी घराघरात पोहोचविला व त्यांना लोकनेते ही पदवी बहाल करण्यात आली. लोकनेते पांडुरंग काळे यांचा राष्ट्रवादी पक्ष मुंबईत वाढवण्यास सिंहाचा वाटा आहे .त्यांचा वसा व वारसा घेऊन वैभव व विपुल ही दोन मुले सून कल्पना समाजकारणात व राजकारणात सक्रिय आहेत.

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्पना वैभव काळे यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवावी यासाठी कार्यकर्त्यांनी शनिवारी (दि.८) रोजी कांदळी येथे मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी बाजार समितीचे संचालक निवृत्ती काळे, नबाजी घाडगे, जुन्नर तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष मंगेश खिलारी, गुलाब घाडगे, अजित घाडगे, बोरी खुर्द चे माजी उपसरपंच सुरेश काळे, संतोष काळे, जुन्नर तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गावडे, बोरी सोसायटीचे चेअरमन सावळेराम काळे, देव प्रशाळेचे अध्यक्ष विक्रम शिंदे तसेच बोरी खोडद जिल्हा परिषद गटातील असंख्य कार्यकर्ते, तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावातील कार्यकर्ते या मेळाव्यात उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, कल्पनाताईंना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी आम्ही सर्वजण पक्षाकडे मागणी करणार आहोत. कल्पनाताईंना निवडून आणणारच अशी खुणगाठ कार्यकर्त्यांनी बांधली आहे. मतदारसंघातील प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले. कल्पनाताईंना प्रत्येक गावातून मतदारांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. अतिशय कमी वेळात कार्यकर्त्यांनी नियोजन करून ६०० कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.


माझे वडील लोकनेते कै.पांडुरंग काळे यांनी शरदचंद्रजी पवार, अजितदादा पवार, कै. वल्लभशेठ बेनके यांच्या मार्गदर्शनाखाली ४० वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ सेवा केली. मी शिरूर लोकसभा मतदारसंघात पक्ष वाढीसाठी असंख्य कार्यकर्ते तयार करून पक्षाची एकनिष्ठ सेवा करत आहे. या जिल्हा परिषद निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या पाठबळावर कल्पना काळे निवडणूक लढविणारच आहे व ती आम्ही जिंकणारच”

वैभव काळे

अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिरूर लोकसभा मतदारसंघ


 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे